भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरदेहीं आयुष्य गमाविलें सारें । परी रामभजन खरें केलें नाहीं

naradehin ayushya gamavilen saren | pari ramabhajan kharen kelen nahin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नरदेहीं आयुष्य गमाविलें सारें । परी रामभजन खरें केलें नाहीं ॥१॥ ऐसें जें अभागी पावती पतनीं । तया सोडवणी कोण करी ॥२॥ एका जनार्दनीं मानी हा विचार । राम चराचर जप करी ॥३॥