भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरदेहीचा हाचि मुख्य स्वार्थ । संतसंग करी परमार्थ

naradehicha hachi mukhya svartha | santasang kari paramartha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नरदेहीचा हाचि मुख्य स्वार्थ । संतसंग करी परमार्थ ॥१॥ आणिक नाहीं पां साधन । मुखीं हरि हरि स्मरण ॥२॥ सोडी द्रव्य दारा आशा संतसंगे दशा पावावी ॥३॥ जरी पोखालें शरीर । तरी तें केव्हाहीं जाणार ॥४॥ जनार्दनाचा एका म्हणे । संतापायी ठाव देणें ॥५॥