भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरदेहा येउनी करावें कीर्तन । वाचे नामस्मरण विठ्ठलाचें

naradeha yeuni karaven kirtan | vache namasmaran viththalachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नरदेहा येउनी करावें कीर्तन । वाचे नामस्मरण विठ्ठलाचें ॥१॥ आणिक सायास न करी आळस । सर्वकळ सोस हाचि वाहे ॥२॥ घटिका आणि पळ न वेंची वायां । नामस्मरणीं काया झिणवावी ॥३॥ प्रपंच परमार्थ करी का रें सारखा । संसार पारखा करुनी सांडी ॥४॥ माईक हें धन इष्टमित्र सखे । अंतकाळीं पारखे अवघे चोर ॥५॥ एका जनार्दनीं न धरी भरंवसा । कोण यमपाशा चुकवील ॥६॥