भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरदेहा येऊनि गमावी आयुष्य । धरीना विश्वास रामनामीं

naradeha yeuni gamavi ayushya | dharina vishvas ramanamin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नरदेहा येऊनि गमावी आयुष्य । धरीना विश्वास रामनामीं ॥१॥ अंतकाळीं तया कोणी न ये कामा । वाउगाचि श्रमा पडतो डोहीं ॥२॥ माझें माझें म्हणोनियां कवटाळीती बाहीं । प्रपंचप्रवाहीं धांव घाली ॥३॥ एका जनार्दनीं करितां कल्पना गेलासे पतना यमलोंकी ॥४॥