भजनी मालिका
← भजनांकडे परत

नरदेह श्रेष्ठ परमपावन । पावोन न करी संतसेवन

naradeh shreshtha paramapavan | pavon na kari santasevan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नरदेह श्रेष्ठ परमपावन । पावोन न करी संतसेवन ॥१॥ ऐसिया नराप्रती जाण । यम यातना करितसे ॥२॥ अपरोक्ष ज्ञान करसवटी । संतावीण नये पोटीं ॥३॥ जैसा अंधारीं खद्योत । तैसा संताविण नरदेह प्राप्त ॥४॥ मनीं विषयाचा अभिलाष । कोण सोडवी तयास ॥५॥ जनार्दनाचा एका म्हणे । संतापायीं देह ठेवणें ॥६॥