भजनी मालिका
← भजनांकडे परत

नानापरी दूत मारिती निष्ठूर । शस्त्रांचें दुस्तर धाय हाणती

nanapari dut mariti nishthur | shastranchen dustar dhay hanati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नानापरी दूत मारिती निष्ठूर । शस्त्रांचें दुस्तर धाय हाणती ॥१॥ अग्नींत घालिती पाणीये बुडविती । ढकलोनियां देता पर्वतशिखरी ॥२॥ एका जनार्दनीं रक्षी नारायण । कोण करीं विघ्न तया भक्ता ॥३॥