भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाना तें चरित्र श्रीहरीचे वाचे । आठवावें साचें अघहरणा

nana ten charitra shrihariche vache | athavaven sachen aghaharana

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाना तें चरित्र श्रीहरीचे वाचे । आठवावें साचें अघहरणा ॥१॥ केशव माधव अच्युत गोपाळ । गोविंद गोकुळपाळ वाचे वदा ॥२॥ वामन श्रीरामकृष्णातें आठवा । हृदयीं साठवा वेळोवेळां ॥३॥ एका जनार्दनीं ऐसा जया हेत । तो वसे जगांत जगरूप ॥४॥