भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाना अवतार धरिले जेणें । दैत्यांसी उणें आणियेलें

nana avatar dharile jenen | daityansi unen aniyelen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाना अवतार धरिले जेणें । दैत्यांसी उणें आणियेलें ॥१॥ तो हा संताचिये भारी । उभा तीरीं चंद्रभागे ॥२॥ तुळशीपत्र बुका मागे । धन वित न लगे म्हणतसे ॥३॥ निळा म्हणे अंतरीचा । भव साचा ओळखें ॥४॥