भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचें

namo vyasadik kavi he pavan | je paripurna dhan bhandarachen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नमो व्यासादिक कवी हे पावन । जे परिपूर्ण धन भांडाराचें ॥१॥ करुनी उपदेश तारिलें बहुतां । उपदेश तत्त्वतां चालतसे ॥२॥ एका जनार्दनीं तुमचा मी दास । येवढी ही आस पुरवावी ॥३॥