भजनी मालिका
← भजनांकडे परत

नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ति उदारा सोपान देवा

namo dnyaneshvara namo dnyaneshvara | nivrutti udara sopan deva

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा । निवृत्ति उदारा सोपान देवा ॥१॥ नमो मुक्ताबाई त्रैलोक्य पावनी । आदित्रय जननी देवाचिया ॥२॥ जगदोध्दारालागी केला अवतार । मिरविला बडिवार सिध्दाईच ॥३॥ निळा शरणागत म्हणवी आपुला । संती मिरविला देऊनि हातीं ॥४॥