भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामें प्रायश्चिती शिक । हाचि देख परमार्थ

namen prayashchiti shik | hachi dekh paramartha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामें प्रायश्चिती शिक । हाचि देख परमार्थ ॥१॥ श्रेष्ठ नाम पावन जगीं । तरतीं अंगीं अधम जन ॥२॥ नेणती यांसी सोपें वर्म । जाणती कर्म सर्वही ॥३॥ कळाकुसरी कांहीं नका । वाचे घोका रामनाम ॥४॥ एका एकापणें मीनला । एका जनार्दनीं भेटला ॥५॥