भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामें पाषाण तरले । महापापी उद्धरिले । राक्षसादि आसुर तरले । एका नामें हरिच्या

namen pashan tarale | mahapapi uddharile | rakshasadi asur tarale | eka namen harichya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामें पाषाण तरले । महापापी उद्धरिले । राक्षसादि आसुर तरले । एका नामें हरिच्या ॥१॥ घेई नाम सदा । तेणें तुटेल आपदा । निवारेल बाधा । पंचभुतांची निश्चयें ॥२॥ हो कां पंडित ब्रह्माज्ञानीं । तरती तारिती मेदिनी । शरण एका जनार्दनीं । नाम उच्चरणीं आनंद ॥३॥