भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामे प्रायाश्चित्तांच्या कोटी । पळताती बारा वाटी

name prayashchittanchya koti | palatati bara vati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामे प्रायाश्चित्तांच्या कोटी । पळताती बारा वाटी ॥१॥ ऐसें नाम समर्थ जपा । तेणें सोपा सुपंथ ॥२॥ रामानामें पतित पावन । रामनामें उद्धरती जन ॥३॥ एका जनार्दनीं वाचे । घोका साचे रामनाम ॥४॥