भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाची आपदा संसारी होत । परि न सोडीच हेत पांडुरंगीं

namayachi apada sansari hot | pari na sodich het pandurangin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामयाची आपदा संसारी होत । परि न सोडीच हेत पांडुरंगीं ॥१॥ म्हणोनियां प्रिय देवासी पैं जाहला । सांभाळी वेळोवेळां नामयासी ॥२॥ एका जनार्दनीं एकविधा भक्ति । तेथें राबे मुक्ति निशिदिनीं ॥३॥