भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामस्मरण अहो जना । तेणें तुटें भवबंधना । येचि देहि येचि काळीं । भजीजे रे नाम जाण

namasmaran aho jana | tenen tuten bhavabandhana | yechi dehi yechi kalin | bhajije re nam jan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामस्मरण अहो जना । तेणें तुटें भवबंधना । येचि देहि येचि काळीं । भजीजे रे नाम जाण ॥१॥ ध्रुव अजामेळ गणिका । नाममात्रें तारिले देखा । आणिकाही भक्त देखा । मोक्ष पावले नामें एका ॥२॥ जो जो कोणी प्रेमें भजतां । पाविजेल सायुज्यता । ऐशी भाक घे रे आतां । जप तप नाम स्मरतां ॥३॥ दीनबंधु दयासिंधु । जेणें केला परमानदु । दृष्ट जना करी भेदु । एका जनार्दनीं नित्यानंदु ॥४॥