भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामरुप मज आणिलें जिहीं । त्यांचिया उपकार नोहें उतराई

namarup maj anilen jihin | tyanchiya upakar nohen utarai

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामरुप मज आणिलें जिहीं । त्यांचिया उपकार नोहें उतराई ॥१॥ भक्तांचे उपकार कशानें फेडीं । यालागीं त्याचें उच्छिष्ट काढी ॥२॥ भक्ताचेनी पालटे येतो गर्भवास । उपकार उतराई नोहे कैसा ॥३॥ एका जनार्दनीं उतराई नोहे । यालागीं भक्तांसी न विसंबें जीवें ॥४॥