भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें वर्म वेदींचें तें कळे । नाम पाठबळें शास्त्रबोध

namapathen varma vedinchen ten kale | nam pathabalen shastrabodh

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें वर्म वेदींचें तें कळे । नाम पाठबळें शास्त्रबोध ॥१॥ या दोहींचेंवर्म ज्ञानदेवी जाणा । जपें कां रे जना हृदयीं सदा ॥२॥ जनार्दनाचा एक विनित हो उनी । आठवितो मनी ज्ञानदेवा ॥३॥