भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें तरला चोखा तो महार । भावें सर्वेश्वर स्थापीं तया

namapathen tarala chokha to mahar | bhaven sarveshvar sthapin taya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें तरला चोखा तो महार । भावें सर्वेश्वर स्थापीं तया ॥१॥ नामपाठ करुनि कीर्ति केली जगीं । उपमा तें अंगीं वाढविली ॥२॥ जनार्दनाचा एक वर्णितो संतांसी । नित्य नामपाठासी अनुसरला ॥३॥