भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें सर्व मुक्तत्त्व साधिती । नामपाठें विरक्ति हातां येत

namapathen sarva muktattva sadhiti | namapathen virakti hatan yet

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें सर्व मुक्तत्त्व साधिती । नामपाठें विरक्ति हातां येत ॥१॥ नामपाठें उद्धव तरला तरला । नामपाठें झाला शापमुक्त ॥२॥ जनार्दनाचा एका बोले लडिवाळ । नामपाठ काळ काळाचाही ॥३॥