भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें मधुसुदन वाचे । अनंत जन्माचें दोष जाती

namapathen madhusudan vache | anant janmachen dosh jati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें मधुसुदन वाचे । अनंत जन्माचें दोष जाती ॥१॥ मधुनामे जैसा मोक्षकेशी वेधु । तैसा तूं बोधूं धरीं देहीं ॥२॥ जनार्दनाचा एका मधुर बोले वाणीं । मधुसूदन चरणीं देउनी दिठी ॥३॥