भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें जनाबाई बरोबरी । दळी कांडी हरि शेणी वेंची

namapathen janabai barobari | dali kandi hari sheni venchi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें जनाबाई बरोबरी । दळी कांडी हरि शेणी वेंची ॥१॥ भक्तांचे सकळ कार्य तें करणें । नये ऐसें उणें करी काम ॥२॥ जनार्दनाचा एक आवड पाहुनी । नाचतो कीर्तनीं नाम गाय ॥३॥