भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें गणिका नेली मोक्षपदा । नामपाठें प्रल्हादा सुख झालें

namapathen ganika neli mokshapada | namapathen pralhada sukh jhalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें गणिका नेली मोक्षपदा । नामपाठें प्रल्हादा सुख झालें ॥१॥ नामपाठें ध्रुव अढळपदीं बैसें । नारद नाचतसे नामपाठे ॥२॥ जनार्दनाचा एक सांगे अनुभव । नामपाठ सर्व जपा आधी ॥३॥