भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें ज्ञानियाची भिंत ओढी । भाविका तांतडी देव धांवे

namapathen dnyaniyachi bhint odhi | bhavika tantadi dev dhanve

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें ज्ञानियाची भिंत ओढी । भाविका तांतडी देव धांवे ॥१॥ बोलविला रेडा केलेंस कवित्व । नामपाठे मुक्त केलें जन ॥२॥ जनार्दनाचा एका लागतो चरणीं । जावे ओवाळीनी जन्मोजन्मीं ॥३॥