भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठें अक्रुर सर्व ब्रह्मारुप । भेदाभेद संकल्प मावळले

namapathen akrur sarva brahmarup | bhedabhed sankalpa mavalale

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठें अक्रुर सर्व ब्रह्मारुप । भेदाभेद संकल्प मावळले ॥१॥ वंदी रजमाथां घाली लोटांगण । द्वैतांचे बंधन तुटोनी गेलें ॥२॥ जनार्दनाचा एका नामपाठें मुक्त । जालासे सतत संतचरणीं ॥३॥