भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ सोपा हरावया पापें । आणीक संकल्प न करी दुजा

namapath sopa haravaya papen | anik sankalpa na kari duja

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ सोपा हरावया पापें । आणीक संकल्प न करी दुजा ॥१॥ नामपाठें सिद्धि नामपाठें सिद्धि । तुटेल उपाधी नामपाठें ॥२॥ जनार्दनाचा एक गात नाचत । नामपाठ करीत सर्वकाळ ॥३॥