भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ सोपा भोळ्या भाविकांसी । मत वादीयांसी न रुचे नाम

namapath sopa bholya bhavikansi | mat vadiyansi na ruche nam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ सोपा भोळ्या भाविकांसी । मत वादीयांसी न रुचे नाम ॥१॥ नवज्वरिता दुग्ध प्राण जाय तत्त्वतां । अभाविकांसी सर्वथा गति तेंची ॥२॥ जनार्दनाचा एक सांगे प्रेमभावें । आदरें तें गावें नामपाठ ॥३॥