भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामपाठ नारायण वदे सर्वकाळ । काळाच तो काळ नारायण

namapath narayan vade sarvakal | kalach to kal narayan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामपाठ नारायण वदे सर्वकाळ । काळाच तो काळ नारायण ॥१॥ नारायण गाय नारायण ध्याय । नारायण पाहे सर्वाठायीं ॥२॥ जनार्दनाचा एका नारायणीं प्रेम । आणिक नाहीं प्रेम दुजा कांहीं ॥३॥