भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामधारक हरीचे दास । करिती नाश पापांचा

namadharak hariche das | kariti nash papancha

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नामधारक हरीचे दास । करिती नाश पापांचा ॥१॥ वसती त्यांच्या सहवासें ते । होताती सरते वैकुंठीं ॥२॥ यमधर्म लागती पायां । लोकत्रयामाजीं धन्य ॥३॥ निळा म्हणे हरिहर देव । करिती राणीव त्यांच्या घरीं ॥४॥