भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामाच्या उच्चारें प्रल्हाद तारिला । अजामेळ गणिकेचा उद्धार केला

namachya uchcharen pralhad tarila | ajamel ganikecha uddhar kela

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामाच्या उच्चारें प्रल्हाद तारिला । अजामेळ गणिकेचा उद्धार केला ॥१॥ तें नाम सोपें श्रीरामाचें । निरंतर वाचे जप करी ॥२॥ करी सर्व भावें रामनाम बोभाट । कळिकाळाचे थाट पुढें पळती ॥३॥ पळतील पातकें नाम उच्चारितां । एका जनार्दनीं म्हणतां रामनाम ॥४॥