भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम वाचे आठविलें । रुप मनीं सांठविलें

nam vache athavilen | rup manin santhavilen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाम वाचे आठविलें । रुप मनीं सांठविलें ॥१॥ आतां फिरुनियां घरां । येशी आपणचि माघारा ॥२॥ लाविला मोकळा । भाव मागें सर्वकाळ ॥३॥ निळा म्हणे आतुडलें । बरें वर्म हातां आलें ॥४॥