भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम उत्तम चांगलें । त्रिभुवनीं तें मिरविलें

nam uttam changalen | tribhuvanin ten miravilen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम उत्तम चांगलें । त्रिभुवनीं तें मिरविलें । जें शंभुनें धरिलें । निजमानसीं आदरें ॥१॥ धन्य मंत्र रामनाम । उच्चारितं होय सकाम । जन्म कर्म आणि धर्म । होय सुलभ प्राणियां ॥२॥ एका जनार्दनीं वाचे । ध्यान सदा श्रीरामांचे । कोटाई तें यज्ञांचे । फळ तात्काळ जिव्हेसी ॥३॥