भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम उत्तम चांगलें । मुक्त केलें पापियां

nam uttam changalen | mukta kelen papiyan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम उत्तम चांगलें । मुक्त केलें पापियां ॥१॥ गातां मुखीं ज्याचीं कीर्ति । योगयाग घडती कोटी देखा ॥२॥ घडती सकळ तीर्थ प्रदक्षिणा । वाचे रामराणा स्मरताची ॥३॥ एका जनार्दनीं सोपें । सुलभ हरावया पापें ॥४॥