भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम उपेंद्र सर्व देवांचा तो इंद्र । शुभ काळ वक्त्र जप सदा

nam upendra sarva devancha to indra | shubh kal vaktra jap sada

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम उपेंद्र सर्व देवांचा तो इंद्र । शुभ काळ वक्त्र जप सदा ॥१॥ तें नाम सोपें जपें कां रे वाचे । अहर्निशी साचें नाम जप ॥२॥ जनार्दनाचा एका एकाभावें नटला । हृदयीं सांठ विला जनार्दन ॥३॥