भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम तें सोपें पद्मनाभ पाठ । करी तूं बोभाट दिवसनिशीं

nam ten sopen padmanabh path | kari tun bobhat divasanishin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम तें सोपें पद्मनाभ पाठ । करी तूं बोभाट दिवसनिशीं ॥१॥ चौसष्ट घडियामाजीं जपें नामावली । कळिकाळ टाळी मारुं न शके ॥२॥ जनार्दनाचा एक नामीं तो निर्भय । कळिकाळ वंदी पाय जन्मोजन्मी ॥३॥