भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम तारक सांगडी । तेणे उतरुं पैलथडी

nam tarak sangadi | tene utarun pailathadi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम तारक सांगडी । तेणे उतरुं पैलथडी ॥१॥ रामनाम जप सोपा । तेणें नेणों पुण्यपापा ॥२॥ सर्व साधनांचे सार । भवसिंधुसी उतार ॥३॥ ऐसा नामाचा प्रताप । एका जनार्दनी नित्य जप ॥४॥