भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम सांडुनिया मुक्ति घेणें । हे तों लक्षणें अधमाची

nam sanduniya mukti ghenen | he ton lakshanen adhamachi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाम सांडुनिया मुक्ति घेणें । हे तों लक्षणें अधमाची ॥१॥ आम्हा विष्णुदासा धर्म । नित्य नेम कथेचा ॥२॥ काय करुं त्या व्युत्पति । वडील हांसती पूर्वज ॥३॥ निळा म्हणे करावी सेवा । आवडी देवा हे माझी ॥४॥