भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम जपे सर्वकाळ । त्यासी भयभीत काळ

nam jape sarvakal | tyasi bhayabhit kal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम जपे सर्वकाळ । त्यासी भयभीत काळ ॥१॥ रामी लीन ज्याची वृत्ती । त्याच्या दासी चारी मुक्ती ॥२॥ रामनामी जिव्हा रंगे । तोचि परब्रह्मा अंगें ॥३॥ म्हणे एका जनार्दनीं । राम दिसे जनीं वनीं ॥४॥