भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम घेतां रुप आठवलें सांवळें । हीं खुण गोपाळें दिली मज

nam ghetan rup athavalen sanvalen | hin khun gopalen dili maj

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम घेतां रुप आठवलें सांवळें । हीं खुण गोपाळें दिली मज ॥१॥ येणें जन्में कृष्ण दाटोनी टाकणें । आडवस्ती पेणें चुकविली ॥२॥ चुकविली वस्ती एका जनार्दनीं । संसार सांडणें सांडोनियां ॥३॥