भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम घेई सदा वाचे । अनंत जन्मांचें दोष जाती

nam ghei sada vache | anant janmanchen dosh jati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाम घेई सदा वाचे । अनंत जन्मांचें दोष जाती ॥१॥ सुलभ सुलभ एक नाम । नाम आराम जपतांची ॥२॥ रानीं वनीं बैसता जनीं । नाम वदनी तो धन्य ॥३॥ एका जनार्दनीं सोपें । हरती पापें जन्माचीं ॥४॥