भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाम भक्ति ज्ञान उपासना दीक्षा

nam bhakti dnyan upasana diksha

रचनाकार: संत जनार्दन · अभंग
नाम भक्ति ज्ञान उपासना दीक्षा । व्यर्थ आत्मसाक्षात्कारें वीण ॥१॥ क्रिया कर्म धर्म साधनें वैराग्य । कृपेविण योग प्राणायाम ॥२॥ राजयोगेवीण केलिया सकळ । होवोनि निर्फळ लाभे शीण ॥३॥ घेती क्लेश दुःख करिती घौती वस्ती । दंडिती जाळिती व्यर्थ देहा ॥४॥ सोशिती सतत श्रम प्रहर आठ । न लभे देव कष्टविल्या देहा ॥५॥ करिती चमत्कार ब्रह्माडींचे सर्व । दाविती भक्तिभाव कळा विद्या ॥६॥ जेथें दंभ वेष चमत्कार सिद्धि । नवजावें कधीं चुकोनिया ॥७॥ असावें सतत श्रीगुरुसन्निध । मोगावा ब्रह्मानंद संसारचि ॥८॥ घेवो नये वेष साधु त्वहि दंभ । दाखवावी ढब नट जैसा ॥९॥ चुकोनि घेतां वेष जाये राजयोग । न भेटेचि मग देव काहीं ॥१०॥ असोनि सकळी वित्त श्रमें मेळवावें । तेणें नित्य भोगावें सेवासुख ॥११॥ जगीं म्हणवावें प्रपंची या मावा । दंडो नये जीवा देहा व्यर्थ ॥१२॥ म्हणे जनार्दन नलमे देव हटीं । उघडी भ्रमताटी एकनाथा ॥१३॥