भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको नको आळस करुं । वाचे श्रीराम उच्चारुं

nako nako alas karun | vache shriram uchcharun

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नको नको आळस करुं । वाचे श्रीराम उच्चारुं । तेणें सुफळ संसारुं । होय जनीं जाणिजे ॥१॥ कां रे न करिसी उच्चार । किती सांगुं तुज विचार । न धरसी निर्धार । मनामाजीं पामरा ॥२॥ जासी भलतीया वाटा । पडसी दारीं आणि दरकुटा । नामावांचुनीं सुटका । एका जनार्दनीं नोहेची ॥३॥