भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको दुजी रे वासना । मिठी घाली संतचरणा । पंढरीचा राणा । आपोआपा हृदयीं

nako duji re vasana | mithi ghali santacharana | pandharicha rana | apoapa hrudayin

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नको दुजी रे वासना । मिठी घाली संतचरणा । पंढरीचा राणा । आपोआपा हृदयीं ॥१॥ हाचि धरी रे विश्वास । सांडी वाउगा हव्यास । नको आशा तृष्णा पाश । परतें टाकी सकळ ॥२॥ भवावदभक्तीचें लक्षण । सर्वांभुतीं समाधान । पाहता दोष आणि गुण । वाउगा शीण मना होय ॥३॥ सर्वांभुतीं देव आहें । सर्व भरुनी उरला पाहे । रिता नाहीं कोठें ठाव । देवाविण सर्वथा ॥४॥ म्हणोनि नको भेदभाव । एक वचनीं एक ठाव । एका जनार्दनीं स्वयमेव । देव उभा पंढरी ॥५॥