भजनी मालिका
← भजनांकडे परत

नको देवराया अंत आता पाहू

nako devaraya ant ata pahu

नको देवराया अंत आता पाहू । प्राण हा सर्वथा फुटो पाहे ।।१।। हरिणीचे पाडस व्याघ्रे धरियेले । मजलागी जाहले तैसे देवा ।। २ ।। तुजवीण ठाव न दिसे त्रिभुवनी । धावे हो जननी विठाबाई ।।३।। मोकलोनी आस जाहले उदास । घेई कान्होपात्रेस हृदयात ।।४।।