भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं कधी वाचे नाम । तो अधम न पहाव

nahin kadhi vache nam | to adham na pahav

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाहीं कधी वाचे नाम । तो अधम न पहाव ॥१॥ होतं त्याचे दरुशन । सचैल स्नान करावें ॥२॥ तयासी ते ऐकता मात । होय घात शरीराचा ॥३॥ ऐसा अधम तो जनीं । नामहीन असतो प्राणी ॥४॥ म्हणोनि नाम आठवावें । एका जनार्दनीं जीवेंभावें ॥५॥