भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं घटिका म्हणसी । लाग लागला तुजपाशीं

nahin ghatika mhanasi | lag lagala tujapashin

नाहीं घटिका म्हणसी । लाग लागला तुजपाशीं । पडिला हृषीकेशी । जाब सकळ करणें ॥१॥ माझें नेलें पांघुरुण । ठावें असोन दुर्बळ दीन । माणसांमधुन । उठविलें खाणोर्‍या ॥२॥ आम्ही हे जगवूनि होतों पाणी । संदीं देवदेव करूनी । जालसी कोठोनि । पैदा चोरा देहाच्या ॥३॥ तुकयाबंधु म्हणे केलें । उघडें मजचि उमगिलें । ऐसें काय गेलें । होते तुज न पुरतें ॥४॥