भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं अटक काळ वेळ । सदा सोंवळें हरिनाम

nahin atak kal vel | sada sonvalen harinam

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नाहीं अटक काळ वेळ । सदा सोंवळें हरिनाम ॥१॥ भलते वेळीं भलते काळीं । वाचे वदा नामावळी ॥२॥ न लगे मुहूर्त अथवा योग । संकल्प सांग मनाचा ॥३॥ एका जनार्दनीं नेम । सोपें नाम जपतां ॥४॥