भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाहीं ऐसें उणेंचि कोठें । भरतो पोट तोंडवरी

nahin aisen unenchi kothen | bharato pot tondavari

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाहीं ऐसें उणेंचि कोठें । भरतो पोट तोंडवरी ॥१॥ बाहेर येती वोसंडोन । चाही कोन उथळोनी ॥२॥ झाली आनंदा दाटणी । गर्जे वाणी त्या सुखें ॥३॥ निळा म्हणे माझी सत्ता । नाहीं वदता विठ्ठल ॥४॥