भजनी मालिका
← भजनांकडे परत

नग घडतां सोनें साचें । न घडतां सोनें पण न वचे

nag ghadatan sonen sachen | na ghadatan sonen pan na vache

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नग घडतां सोनें साचें । न घडतां सोनें पण न वचे ॥१॥ मेघापुर्वी शुद्ध गगन । मेघ सबाह्म गगनीं जाण ॥२॥ कुल्लाळ जें भांडें घडीत । त्यासी मृत्तिका नित्य व्याप्त ॥३॥ सागरीं जें जें उपजे लहरी । तैसा व्यापक श्रीहरीं ॥४॥ जन तोचि जनार्दन । एका जनार्दन व्यापक पूर्ण ॥५॥