भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाढळे कधींही पंढरी । नका सांगो त्याची थोरी

nadhale kadhinhi pandhari | naka sango tyachi thori

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाढळे कधींही पंढरी । नका सांगो त्याची थोरी ॥१॥ मिथ्या करिती ते चार । सोंग कथेचा विस्तार ॥२॥ नाहीं प्रेमा पांडुरंगी चित्त विषयसेवा भोगीं ॥३॥ निळा म्हणे दावी जैसें । नाहीं अंतर झालें तैसें ॥४॥