भजनी मालिका
← भजनांकडे परत

नाचती विनोंदें

nachati vinonden

रचनाकार: संत निळोबा · अभंग
नाचती विनोंदें । क्रीडा करी त्यांच्या छंदें ॥१॥ गोवळ वांकुल्या दाविती । आलें वाचे ते बोलती ॥२॥ म्हणती चोरटया शिनळा । दोघां बापांचिया बाळा ॥३॥ लटिकीया कपटिया कुचरा । निर्बल नपूंसका निष्ठूरा ॥४॥ तोंडें वांकुडी पिचके डोळे । तयां माजीं आवडी खेळे ॥५॥ निळा म्हणे विश्वासिया । न वजे दुरि पासूनियां ॥६॥